आय बी टी विभागवार परिचय
Introduction to Basic Technology ( IBT ) विद्यार्थ्यांचा आवडता दिवस आणि आवडता विषय संक्षिप्त नाव तेही विद्यार्थ्यांनी दिलेले "टेक्निकल किंवा आय.बी.टी." विद्यालयामध्ये ८ वी ते १० वी चे वर्ग इतर शाळांसारखे चालतातच परंतु २००७-०८ पासून वैशिष्ट्य ठरलेले मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा (V1) विषय विद्यार्थ्यांना ८ वी ते १० वी मध्ये शिकवला जातो. हा कोर्स राबवणारी आंबेगाव तालुक्यातील हि पहिली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. 'काम करत शिकणे' या मान्यतेवर आधारित कोर्स डॉ. कलबाग, विज्ञान आश्रम चे संस्थापक यांनी तयार केला आणि देशभरातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. आता तर हा मुख्यविषयांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा कोर्स मुख्यतः ४ विभागांमध्ये विभागला आहे-
१) अभियांत्रिकी
२) उर्जा- पर्यावरण
३) शेती- पशुपालन
४) गृह-आरोग्य
आठवड्यातील ३ दिवस विद्यार्थी हे विषय शिकतात. गावडेवाडी शाळेने सोम- ८ वी, मंगळवार- ९ वी, बुधवार- १० वी असे वेळापत्रक तयार केले आहे. Theory (२०%) & Practical (८०%) अशा प्रकारे अभ्यासक्रमाचे विभाजन करण्यात आले आहे. ८ आणि ९ वी मध्ये बेसिक गोष्टी प्रात्यक्षिकाद्वारे शिकून १० वी ला स्वतंत्र प्रकल्प घेतात. हे प्रकल्प समाजाची गरज, उपलब्ध साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान, अवगत असलेले ज्ञान, इ. बाबींवरती अवलंबून असतात. शाळा आय.बी. टी. विषयांसाठी स्वतंत्र इमारत, साधने व साहित्य, निदेशक पुरवते. या विषयासाठी विज्ञान आश्रम हि शाळेस मार्गदर्शन करत आहे.
(शै. वर्ष २०१६-१७ च्या घडामोडी लवकरच वाचकांसाठी post केल्या जातील)
आय बी टी साठी विविध संस्थाचे योगदान