उपक्रम




उपक्रम
          विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते त्यात घवघवीत यश प्राप्त करणारी विध्यार्थी आहेत. विशेषतः दुर्गा देवी ट्रस्ट,पुणे व आंबेगावतालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने घेतल्या जाणार्या सामान्य ज्ञान परीक्षेत दरवर्षी अनेक विध्यार्थी शिष्यवृत्ती मिळते. तसेच, एन.एम.एम.एस. परीक्षा, शासकीय चित्रकला, राष्ट्र भाषा हिंदी, परीक्षेत मुले  सहभागी होतात.
          अंधश्रधा निर्मुलन पर्यावरण प्रदुषण यावर विशेष कार्यक्रम होतात. प्रदुषण विषयक नाट्य व चित्रकला स्पर्धेत सहभाग असतो. सांस्कृतिक उपक्रम अंतर्गत समूह गीत, लोकगीत, लोककला यात सहभाग असतो.विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल इ. शैक्षणिक सहलींचे दरवर्षी विविध ठिकाणी आयोजन केले जाते. विज्ञान विषयक उपक्रमात शाळा पातळी, जिल्हा पातळी सहभाग असतो. तसेच, उन्हाळी शिबिरासाठी मुलांचा सहभाग असतो. कल्पक - लाही उपक्रम, आयसर - विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या मार्गदर्शनाखालील विविध उपक्रम, आय.आय.टी पवई, इन्फोसिस कंपनी उपक्रम, विविध शासकीय योजनांचा विध्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला जातो.



































Popular posts from this blog

सन २०१८-१९ आय बी टी प्रकल्प